केज/प्रतिनिधी
केज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील १५ मोटरसायकली जप्त करून ९ गुन्ह्याची माहिती उघडकीस आली असून ९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एका आरोपीला गजाआड केले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध डी.बी.
पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करून मोठी कारवाई केली आहे.
या कारवाई दरम्यान विविध गुन्ह्यातील आरोपीकडून वेगवेगळ्या जिल्ह्यातून चोरी गेलेल्या १५ मोटरसायकली हस्तगत करण्यात केज पोलिसांना यश आले आहे.
सदर कारवाईत एकूण ९ मोटरसायकल गुन्हे उघडतीस आले असून अंदाजे ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व तपासातील कौशल्याचा वापर करून आरोपीचा शोध घेऊन त्यानंतर विविध ठिकाणावरून चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील पोलीस ठाणे केज येथील ३ गुन्हे, आंबेजोगाई शहर पोलीस ठाणे येथील१ गुन्हा, गेवराई पोलीस ठाणे येथील १ यासह इतर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड सह इतर ठिकाणच्या चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली आहे.५ मोटरसायकलची ओळख होने कामी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, आंबेजोगाई यांना पत्र देण्यात आले आहे.
केज पोलीस ठाणे येथील डी.बी.पथकाने दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपी संजू बबन पवार वय ३२ वर्षे रा.खर्डा ता.जामखेड जि. अहिल्यानगर याला केज तालुक्यातील नांदुर घाट येथून ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमेर इनामदार, पोह/बाळासाहेब अहंकारे, पोअं/तरकसे,पोअं/देवगुडे,पोअं/वारे,पोअं/शिवाजी कागदे,पोअं/संतोष गीते यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे.