केज/प्रतिनिधी
केज येथील श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था,आडस संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालय,केज मध्ये कार्यरत असणारे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. नवनाथ काशीद यांनी पर्यावरणातील समस्या व त्याचे संवर्धन याविषयी पुस्तकाचे संपादन केले आहे. या पर्यावरण व मानवी जीवन पुस्तकाचे प्रकाशन २६ नोवेंबर २०२६ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून त्याचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशनाबद्दल संस्थेच्या सचिव सौ.अर्चनाताई आडसकर व रमेशराव आडसकर यांनी अभिनंदन केले आहे
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ. संतोष तळेकर, विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग श्रीमती केशरबाई सोनाजीराव शिरसागर महाविद्यालय बीड हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. अनिल किदंत प्राचार्य बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज हे होते. या प्रकाशन सोहळ्यास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. क्तुळशीदास बिडवे,डॉ. श्याम सरसरे सोबतच डॉ.सचिन शिंदे, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.आशा बोबडे , प्रा. डॉ. गंगणे मॅडम, प्रा. डॉ. प्रशांत क्षीरसागर , प्रा डॉ.सुनील राऊत , प्रा.डॉ.मनोज माने, प्रा. जरीचंद यादव, वाणिज्य विभागाचे डॉ. सुधीर आगळे, डॉ.प्रमोद काळम व डॉ.महादेव कांबळे यांची उपस्थिती होती. शब्दभारती ग्लोबल प्रेस यांनी हे दर्जेदार पुस्तक प्रकाशित केले आहे. अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.